नांदोस हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. नांदोस हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे २५ किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे १२ किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये १६ वाड्या आहेत. गावची लोकसंख्या १६८२ इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी,होळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये तीन प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये सरपंच व ९ कार्यकारिणी सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व ३ कर्मचारी आहेत.